आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक:डिसेंबर महिन्यांत राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर परिचय मेळावा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वधू-वरांच्या पालकांची होणारी धावपळ खर्च टाळावा म्हणून तसेच तेली समाज गतीने संघटित व्हावा. बोगस संस्थेच्या माध्यमातून समाज बांधवांची होणारी आर्थिक फसवणूक थांबावी यासाठी राज्यस्तरीय तेली समाज बांधवांनी वधु वर परिचय मिळाव्याचे नियेाजन केले आहे. राज्यस्तरीय बैठक नुकतीच औरंगाबादेत पार पडली असून येत्या १८ डिसेंबर महिण्यात वधु वर परिचय मेळावा होणार असल्याचे जालन्याच्या सुंनदा अबोली यांनी सांगीतले.

राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर परिचय मेळावा सेवा समितीकडून घेण्यात आलेल्या बैठकीत काही ठराव घेण्यात आले. ज्यामध्ये इच्छुक वधू-वरांना ऑनलाइन स्थळ सुचविणे, वर्षातून दोन मेळावे घेणे एक औरंगाबादला व दुसरी इतर जिल्ह्यांमध्ये सर्वांच्या चर्चेनुसार ठिकाण निवडणे, सर्व जिल्ह्यामध्ये वधु-वरांशी थेट संवाद साधून नोंदणी मोहीम राबविणे, तेली समाज राज्यस्तरीय मेळावे दरवर्षी १८ डिसेंबर रोजी दुसरा १० मे रोजी घेण्याचा निर्णय घेणे आदी प्रकारचे ठराव या बैठकीत घेण्यात आले.

या बैठकीसाठी जयवंतराव चौधरी धुळे, भगवान मिटकर पैठण, किशोर चौधरी धुळे, बाबासाहेब टिवटे अहमदनगर, सुनिल क्षीरसागर औरंगाबाद, लक्ष्मण राऊत औरंगाबाद, श्रीकृष्णा औरंगाबाद श्री. साई शेलार औरंगाबाद, संगीता चौधरी पुणे, भारती चौधरी धुळे, पुष्पाताई चौधरी नाशिक, सुंनदा अबोली जालना, नालिनी चौधरी वरणगाव, अर्चना फिरके या राज्यभरातून आलेल्या सक्रीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...