आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्था आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या जिजाऊ कबड्डी चषक - २०२३ या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत गेल्या दोन दिवसापासून चित्तथरारक आणि जालनेकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लढती झाल्या. शनिवारी दुसऱ्या दिवशी पुरुष आणि महिला गटाच्या लढती अत्यंत रंगतदार झाल्या.
शनिवारी महिला गटात झालेल्या लढतीत मानवत स्पोर्ट अकॅडमीने सत्यशोधक क्रीडा संघ गोसेगावचा पराभव केला. राजमुद्रा क्रीडा मंडळ संभाजीनगर विरुद्ध सत्यशोधक विद्यालय गोषेगाव यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. महिला गटातील मारोतराव घुले विद्यालय दहेगाव विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी जालना त्यांच्यातील सामना चुरशीचा ठरला. पुरुष गटात राजमुद्रा क्रीडा मंडळ विरुद्ध डॉ. नारायणराव मुंडे क्रीडा मंडळ जालना, युवा पुरुष ढवळेश्वर विरुद्ध पैठण क्रीडा मंडळ पैठण यांच्यात लढती सुरू होत्या.
सकाळच्या सत्रात क्रीडा प्रबोधनी जालना विरुद्ध एकता कबड्डी मंडळ पूर्णा यांच्यात रंगतदार लढत होऊन १३ गुणांनी क्रीडा प्रबोधिनीचा संघ विजयी झाला. यावेळी व्यासपीठावर डॉ. नारायणराव मुंढे, प्रा. सत्संग मुंढे, प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्रा डॉ. प्रताप रामपुरे, आश्लेषा फ्री इंग्लिश स्कूलच्या संचालिका शुभदा मुंढे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जायभाये, बी. के. कराड, डी. एल. पवार, डॉ. बप्पासाहेब मस्के, प्रा. डॉ. प्रमोद ढोकणे, दुपारच्या सत्रात बाबुराव सतकर, सुदामराव सदाशिवे, भगवानराव मुंढे, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, विजय कामड, मधुरा मुंढे, डॉ. भगवानसिंग डोभाळ, भारतीय जीवन विमा निगमचे पांडुरंग सांगळे, प्रायोजक म्हणून मदत करणारे नागरे मसालेवाले आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी मुख्य संयोजक तथा महात्मा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सत्संग मुंढे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके, संयोजन समितीचे विजय कामड, अब्दुल हाफिज, सुदामराव सदाशिवे, बाबुराव सतकर टीम परिश्रम घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.