आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:राज्याच्या नोडल अधिकारीपदी डॉ. प्रशांतकुमार वनंजेंची नियुक्ती

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि युनिसेफच्या समन्वयाने विविध उपक्रम राबवण्यासाठी जालना येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांची राज्य शासनाच्या तर युसूफ कबीर यांची युनिसेफच्या नोडल अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यातील महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे तसेच पाण्याची बचत करणे आदी उपक्रमांची प्राथमिक टप्प्यात विद्यापीठांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, सातारा, बीड व त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यासदंर्भात मुंबई विद्यापीठ मुंबई, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांना उपक्रमांच्या अंमलबजावणी संदर्भात कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...