आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:जालना जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियागृहाची सुरुवात; राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असे सर्वसाधारण व ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियागृह व शवचिकित्सागृह उभारण्यात आले असून याचे लोकार्पण सोमवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या शस्त्रक्रियागृहाचा उपयोग सर्वसामान्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी करण्याची सूचना सूचनाही मंत्री टोपे यांनी केली.

जिल्हाधिकारी डॉ‍. विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. प्रताप घोडके, डॉ. संजय जगताप, डॉ. नितीन पवार, डॉ. प्रवीण मरकड, डॉ. राजू जाधव, डॉ. अनिल पवार, डॉ. योगेश राठोड, डॉ. अभय गोंदीकर, डॉ. राहुल भालेराव, डॉ. नितीन शहा, डॉ. शेख आरिफ, डॉ. शेजुळे, डॉ. मूलगीर, डॉ. अपर्णा सोळुंके, डॉ. उमेश जाधव, डॉ. संतोष जायभाये आदींची उपस्थिती होती. मंत्री टोपे म्हणाले, आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्याच्या सेवा अधिक बळकट करण्यावर शासनामार्फत भर देण्यात येत आहे. अत्याधुनिक अशा शस्त्रक्रियागृहांची उभारणी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात येणार असून जालन्यापासून याचा शुभारंभ करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

शस्त्रक्रियागृहात मध्यवर्ती यंत्रणा : संसर्गबाधा होऊ नये यासाठी शस्त्रक्रियागृहाला स्टेनलेस स्टीलचे आवरण देण्यात आले असून या ठिकाणी मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, ऑक्सिजन आदी सुविधांबरोबरच तीन प्रकारचे फिल्टर बसवण्यात आले आहेत. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियागृहात अत्याधुनिक सियाम मशीन्स, फ्रॅक्चर टेबल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

व्हिसेराचा अहवाल मिळण्यासाठी सॉफ्टवेअर निर्मिती : शवचिकित्सागृहात दोन मोठे हॉल, बॉडीवॉश, व्हिसेरासाठी स्वतंत्र दालन, शवपेट्या ठेवण्यासाठी सुविधा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...