आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहभाग:विद्यापीठात 3 डिसेंबरपासून राज्य क्रीडा महाेत्सव; 3500 खेळाडूंचा सहभाग

जालना2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३ ते ७ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवात ३५०० खेळाडू सहभागी होतील. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. उद्घाटन सोहळ्यास ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले तर बक्षीस वितरणास तीरंदाज सुमंगल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहील. स्पर्धेसाठी सुमारे २.७० कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी क्रीडा महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व प्र-कुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू म्हणाले की, या महोत्सवात अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो या पाच खेळांचा समावेश असून २२ विद्यापीठांचे महिला-पुरुष संघ सहभागी होणार आहेत. कबड्डी स्पर्धा मॅटवर तर खो-खाे स्पर्धा मातीच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवली जाईल. २७ नोव्हेंबर ही प्रवेशाची अंतिम तारीख आहे.

महोत्सवासाठी राज्यपाल नियुक्त निरीक्षक समिती तसेच स्वागत, निवास, भोजन, वित्त, खेळनिहाय मैदान, पात्रता तपासणी, खेळांचे तांत्रिक अधिकारी अशा ३० समित्यांची नियुक्ती झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन ३ डिसेंबरला दुपारी ४ वाजता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. अॅथलेटिक्स मैदानावरील सिंथेटिक ट्रकच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही होईल. बक्षीस वितरणास राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन, ऑलिम्पियन सुमंगल शर्मा उपस्थित राहतील. या वेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.कल्पना झरीकर, संयोजन समिती सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, संजय शिंदे उपस्थित होते.

प्रथमच खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी
विद्यापीठाच्या क्रीडा इतिहासात प्रथमच खेळाडूंची संपूर्ण नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या युनिक टीमने नवीन सॉफ्टवेअर बनवले आहे. पारदर्शकतेमुळे बोगस खेळाडू खेळण्यावर आळा बसेल. मैदानावर सर्व खेळ एकच ठिकाणी दिसतील अशी सोय करण्यात आली असून त्यासाठी मोठे एलएडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...