आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:राज्य क्रीडा ज्योतीचे अंबड शहरात स्वागत

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य क्रीडा महोत्सवाच्या विचारांनी प्रज्वलित झालेल्या क्रीडा ज्योतीचे स्वागत अंबड शहरात माजी प्राचार्य डॉ. भागवत कटारे यांच्यासह सहकाऱ्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या या राज्य क्रीडा महोत्सवाचा पाश्वभुमीवर येत्या ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान तुळजापूर ते औरंगाबाद या दरम्यान मशाल रॅली क्रीडा ज्योत चे आयोजन करण्यात आले आहे, कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथी तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करून मशाल रॅलीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

३ ते ७ डिसेंबर दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित २४ वा महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या आज आई तुळजाभवानीच्या मंदिरातून बुधवारी सकाळी मशाल प्रज्वलित करून मशाल रॅलीस प्रारंभ झाला. मशाल रॅलीचे समन्वयक डॉ. संदीप जगताप, डॉ. पांडुरंग रणमाळ, डॉ. भुजंग डावकर, गणेश जाधव, कृष्णा फले, जावेद शेख आदींसह विविध महाविद्यालयातील खेळाडू व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर मशाल रॅली ही दुपारी अंबड शहरात आगमन झाल्यावर मत्सोदरी महाविद्यालयातील १५०० विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भागवत कटारे, प्राचार्य डॉ. शहाजी गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. प्रशांत तौर, पांडुरंग गहिरे, डॉ. अनिल निंबाळकर, डॉ. दिगंबर भुतेकर, प्रा. कल्याण एखंडे, पोलीस निरीक्षक श्री. शिरीष हुंबे, रामेश्वर मुळूक प्रा. जानकी कुर्तडीकर, प्रा. कृष्णा परमेश्वर, प्रा. रवींद्र पैठणे आदींची उपस्थिती होती. विद्यापीठाच्या क्रीडांगणावर ३ ते ७ डिसेंबर दरम्यान राज्य क्रीडा महोत्सव रंगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...