आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गायकवाडविरुद्ध कारवाईसाठी  तीर्थपुरी वंचित बहुजनचे निवेदन

तीर्थपुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पनवेल येथील जगदिश गायकवाड याने आंबेडकर कुटुंबावर तसेच आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांविरुद्ध केलेले वक्तव्य हे बदनाम करण्याचे एक षडयंत्र असण्याची शक्यता असून गरळ ओकणाऱ्या जगदीश गायकवाडवर कठोर कारवाई करण्यासाठी तीर्थपुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येऊन पोलिसांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भारत वानखेडे, डोईफोडे, तुळशिराम वानखेडे, रमेश कासार, शहराध्यक्ष आतिश वानखेडे, राजेंद्र वानखेडे, धम्मा गाडेकर, आकाश वानखेडे आदी समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...