आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधांबाबत तक्रारी:विद्यार्थ्यांशी संवादासाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांचा वसतिगृहात मुक्काम

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून सोयी सुविधांबाबत तक्रारी होतात. अनेकांना समस्या असतात मात्र, त्याचे निरसन होत नाही. यासाठी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री सहायक आयुक्तांनी थेट वसतिगृहात मुक्काम ठोकला. समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी थेट विद्यार्थ्यांसोबतच थेट शासकीय वसतिगृहात रात्रभर मुक्काम ठोकून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून राज्यात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या विभागाचा प्रमुख वसतिगृहात रात्रभर मुक्काम करण्याची घटना घडली आहे. या संवाद उपक्रमामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील सुखद धक्का बसला आहे. आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देखील पुणे येथील वसतिगृहात मुक्कम करून स्वतः विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या सुविधा, जेवण व विद्यार्थ्यांमार्फत राबवण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली.

सोमवारी अमित घवले सहायक आयुक्त, समाजकल्याण जालना यांनी जालना परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह, जालना या वसतिगृहात मुक्काम केला आहे. तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जालना जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील वसतिगृह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच वसतिगृहात मुक्काम करून त्यांच्या सोबत संवाद व जेवण केले. विद्यार्थ्यांनी देखील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी त्यांनी वसतिगृह गृहपाल व अधीक्षक यांना वसतिगृहात निवास करण्याबाबत सक्त ताकीद दिली व तक्रारी प्राप्त झाल्यास सक्त कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...