आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्पमाला अर्पण:जिल्हाभरात युवा सेनेच्या शाखांचे जाळे पसरवणार : शिवाजी शेजूळ

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना नगर परिषद आवारातील महात्मा जोतिबा फुले व रेल्वे गेट जवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून, वंदन करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे जालना नगर पालिकेने कायमस्वरूपी पायऱ्यांची अथवा सदरील ठिकाणी स्टील रॅलींग व स्टील शिडीचे पक्के काम करावे, अशी मागणी माॅ. बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांनी केली आहे.

जालना शहरातील न.प. समोरील महात्मा जोतिबा फुले व न.प. गेटजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. पुर्णाकृती पुतळ्यावर अभिवादन व जयंती साजरी करतांना वरती जावून पुष्पहार अर्पण करता येत नाही. व वरती जावून फिरतांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून याकरीता पुतळ्याभोवती उभे राहण्याकरीता फिरता यावे म्हणून जागा करून, स्टील रॅलींग व स्टील शिडीचे पक्के काम करावे, अशी मागणीही वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...