आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कट:रामनगरसह परिसरातील कृषिपंपाची वीज कट करणे थांबवावे : कानडे

रामनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील रामनगर सह परिसतील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. तसेच जालना तालुक्यातील महावितरणच्या अधिकारी - कर्मचारी यांनी धडक वसुली मोहीम राबवत असंख्य शेतकऱ्याच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत केला आहे.

यामुळे आधीच अतिवृष्टी ने हैराण झाले असून खरीपचे दुःख बाजूला सारत मोठ्या उमेदीने रबीची पेरणी केली असून मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे परंतु महावितरणच्या वसुली मोहिमेने शेतकरी हैराण झाले आहेत. ही वीज जोडणी पूर्ववत चालू करावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते तथा पारेगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन कानडे यांनी केली आहे. दरम्यान, मागील काही चार पाच वर्षापासून शेतकरी नैसर्गिक संकटाने हतबल झालेले आहेत. शासनाकडून मिळणारे अनुदानही तोकडेच आहे. असेही कानडे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...