आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:वाढीव दराने होणारी खत, बियाण्यांची विक्री थांबवावी; अंबड कृषी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा छावा संघटनेने दिला इशारा

अंबड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात वाढीव दराने होणारी खत आणि बियाणांची विक्री आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अन्यथा कृषी अधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने देण्यात आला. तालुका कृषी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले, खते आणि कपाशी बियाणांची वाढीव दराने विक्री केली जात आहे. यातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन कृषी सेवा केंद्र तपासणी केली असता खत असताना दुकानदार नाही म्हणून सांगतात मात्र वाढीव दर दिला तर लगेच मिळते. हा प्रकार त्वरीत थांबवावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे संतोष जेधे, राधेश्याम पवळ, उमेश गव्हाणे, नानासाहेब जोगदंड, आकाश जाधव यांच्यासह आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...