आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:बदनापूर स्थानकावर एक्स्प्रेस गाड्या थांबवा

बदनापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - औरंगाबाद रेल्वे मार्गावर बदनापूर हे व्यापारी ठिकाण असल्याने या तिचे व्यापारी खरेदीसाठी मुंबई, हैदराबाद आदी शहरात जात असतात परंतु दक्षीण मध्य रेल्वेच्या जलद रेल्वे बदनापूर येथे थांबा घेत नसल्यामुळे व्यापारी, नागरिक आदींना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असून बदनापूर येथे जलद गाड्यांना थांबा द्या अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

मात्र, या मागणीकडे प्रशासन लक्ष देत नाही. बदनापूरला थांबा मंजूर करण्यात यावा अशी मागणी मनसेचे जालना जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांनी केली आहे. परतूर, सेलु, मानवत रोड आदी तालुक्याच्या ठिकाणी हैद्राबाद व मुंबई कडे जाणाऱ्या बहुतांशी जलद रेल्वे गाड्यांना थांबा आहे. मात्र, बदनापूर हे तालुक्याचे ठिकाण असतांनाही येथे मराठवाडा एक्सप्रेस वगळता इतर कोणत्याही जलद रेल्वे गाड्यांना थांबा नाही ही दुर्दैवाची बाब आहे.

एकूणच रेल्वे प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे बदनापूर शहरासह तालुक्यातील उद्योग व्यवसायावर परिणाम होत आहे. बदनापूर रेल्वे स्थानकावर जालना येथुन मुंबई येथे जाणारी जनशताब्दी रेल्वे तपोवन रेल्वे, नंदीग्राम देवगीरी रेल्वे अशा जलद रेल्वे गाडयांचा किमान एक मिनीट का होईना थांबा देणे गरजेचे आहे.