आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरिपातील साठवून ठेवलेल्या सोयाबीन, कापुस, तुर यांच्या निचांकी भावामुळे उत्पादन शेतकरी हैराण झालेला असतानाच सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे विजेच्या कडकडाट वादळीव ऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऐन पिक कापणीच्या हंगामात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या पावसात गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा यासह पिकांना मोठा फटका बसला आहे.
त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून सरसगट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. मागील सलग तीन वर्षांपासून संकटांची मालिका कायम आहे. खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग, हरभरा या पिकांचे नुकसान झाल्याने पिकांना मोठा फटका बसला होता. यात पिकांचा उतारा हा निम्म्यावर आला होता. त्यात पुढे मालाची भाववाढ होईल म्हणून शेतकऱ्यांनी माल घरात साठवला होता.
मात्र भाववाढ न होता त्याच भावांचे दर कोसळत असल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मध्येच पावसाने रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान करुन मेटाकुटीला आणले आहे. आष्टी मंडळातील ३४९६ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी ३२६२ हेक्टर लागवडीसाठी योग्य आहे त्यात यंदा गहूं ५२७; ज्वारी ५२३,; हरभरा ६६२ हेक्टरवर पेरणी झालेली होती.
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत खरिप पिकांना कमी भाव मिळत असल्याने ते माल घरातच साठवला आहे. उसनवारी करत रब्बीची पेरणी केली आता माल हातातोंडाशी आलेला असताना तो पावसाने हिरावला सरकारने पंचेनामे न करता सरसगट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पांडेपोखरी येथील शेतकरी कृष्णा गोरे यांनी केली. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे गहू आणि मका पिकासह हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात पेरलेल्या गहू हरभरा पिकासह बहर आलेल्या आंबा फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. आधीच शेतकरी शेतमालाला भाव नसल्यामुळे हवालदि ल झालेला असताना त्यात पुन्हा संकटात भर पडली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.