आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय महिला जनवादी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन तोतया डॉक्टर गवारे व त्याच्या सहकाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले की, जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात ढवळेश्वर येथील राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गर्भलिंग निदान व गर्भपाताचा अत्यंत घृणास्पद प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सूरु होता. आरोग्य विभागाने त्या प्रकारची गुप्तपणे माहिती घेऊन त्या बोगस दवाखान्यावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी व त्याच्या सहकाऱ्यांनी छापा मारून दोन कॅम्पाडर हे बोगस माणसे डॉक्टर म्हणून काम करतात. ते चिनी बनावटीच्या पोर्टेबल मशिन वापरत होते.याची कुठे ही नोंद नाही.
दिवसेंदिवस देशात मुलींचे प्रमाण कमी होत असताना आणि राज्याचे आरोग्य मंत्री जालना येथील असून त्यांच्या जिल्ह्यात हा घृणास्पद प्रकार घडणे म्हणजे सर्व अंदाधुंदी कारभार असून हा सर्व प्रकार लज्जास्पद असून सदर प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली पाहिजे व जिल्ह्यातील असले बोगस दवाखाने शोधून त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सुनंदा तिडके, डॉ.संजीवनी तडेगावकर, रेखा गतखणे, शैला पोपळघट, अनया अग्रवाल, मथुरा रत्नपारखे, कांचन वाहुळे, योगिता खांडेभराड, रेखा काकडे, कल्पना आर्दड, पार्वती ममदाबादे, पंडित लव्हटे, अनिल मिसाळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.