आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

350 कंत्राटी कामगार:थकीत वेतनासाठी उपोषणाचा इशारा

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या विभाग २ मध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील सात महिन्यापासूनचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, नसता येत्या ९ नोव्हेंबर पासून जालना येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील महावितरण कंपनीत दोन विभागात यंत्रचालक व लाईनमन असे सुमारे ३५० कंत्राटी कामगार मागील दहा ते बारा वर्षांपासून नियमित रिक्त पदांच्या जागेवर कंत्राटी पद्धतीने काम करत असून यांचे माहे एप्रिल २०२२ पासून वेतन मिळत नसल्या कारणाने संघटनेने अनेकदा अधिक्षक अभियंता जालना यांच्या कडे लेखी तक्रार देऊनही मागील ७ महिने कामगारांचे वेतन झाले नाही.

काम करून घेणे हे अमानवी व निसर्ग न्याया पासून कामगारांना वंचित ठेवल्यासारखे आहे. त्यामुळे सदर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, थकीत वेतन मिळावे, न्यायालय संरक्षित कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे या सर्व मागण्या मान्य होई पर्यंत बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पासून जालना महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय, कन्हैयानगर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...