आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमेंट रस्ता:सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील : खोतकर

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना नगर परिषद हद्दीत शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नामधून दहा लक्ष रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या जवाहर बाग मुर्गीतलाव येथील सिमेंट रस्ता, भूमिगत नाली या कामाच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी झाला. तसेच मजुरांना ई श्रमकार्ड आणि साक्षरता प्रमाणपत्राचे वाटप योळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना खोतकर यांनी सांगितले की, आपण जालना शहर व शहरातील झोपडपट्टी, विकासासाठी सतत प्रयत्नशील असतो. विकासासाठी विविध योजनेतून निधीसह विकास कामे केलेले असून, यापुढे राज्य व केंद्र शासनाकडुन निधीसह विकास कामांना मंजूरी मिळवणार आहे. तसेच जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्रक मिळावे , म्हणून आपण सतत प्रयत्न करत आहोत. या संदर्भात शासनाने मालमत्ता पत्रक झोपडपट्टीधारकांना द्यावेत असा आदेश असताना सुद्धा स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे या कामात दिरंगाई होत आहे.

यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून झोपडपट्टीधारकांना मालमत्ता पत्रक वितरीत करण्यासाठी प्रयत्नशील करणार आहोत असे सांगितले. ही विकास कामे मंजूर केल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांनी अर्जुन खोतकर यांचा नागरकांनी नागरी सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, रविकांत जगधने, संजय शर्मा, अंकुश शितोळे, देवेंद्र बुंदले यांच्यासह आयोजक रविकांत जगधने, सय्यद अनिसभाई,संतोष खंडागळे, रमेश तांबे, सय्यद मुद्दसिर, धोंडीराम अडागले, अशोक सराटे, शेख मुश्ताक भाई, शेख शाहरुख, शरद खंदारे, राहुल साने, देवराज कांबळे, सचिन साने, बद्री वानखेडे, शेख शकील, गणेश अंभोरे, सुखदान उघडे, दिनेश दाभाडे आदी पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिका तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...