आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंड येथील तीर्थस्थळ सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला झारखंड येथील राज्य सरकारच्या अनुमतीने केंद्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. केंद्र सरकारने व झारखंड सरकारने घेतलेले या निर्णयाचा भारतातील समस्त जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. या निर्णया विरोधात अंबड तालुक्यातील सकल जैन बांधवांनी ११ रविवारी तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढून या बाबींचा निषेध व्यक्त केला.
रविवारी शहरात काढलेला हा मोर्चा १००८ भगवान महावीर मंदिरातून निघून महाराष्ट्रद्वार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, बस स्थानक येथून मार्गस्थ होत तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी नायब तहसीलदार अंजली कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे झारखंड सरकारने येथे पर्यटन स्थळाविषयी चा निर्णय रद्द करून या पवित्र स्थानाला जैन धर्मियांचे तीर्थस्थळ असे घोषित करावे. सम्मेद शिखरजी हे जैन समाजाचे सर्वोच्च स्थान असून ही मोक्ष भूमी आहे. सरकारने या पवित्र भूमीला पर्यटन स्थळ घोषित केल्याने येथील पावित्र्य धोकात आले आहे.
संपूर्ण देशातील जैन समाजाचे हे श्रद्धास्थान आहे. या तीर्थस्थळाला पर्यटन स्थळ बनविल्याने येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. शिखरावरची २८ किलोमीटरची चढाई ही जैन समाज पायीच चालत करत असतो. जैन धर्माचे एकूण २४ तीर्थंकर यापैकी २० तीर्थंकर या पवित्र स्थळातून मोक्ष मार्गाला गेलेले आहेत त्यामुळे शिखर्जी हे संपूर्ण देशातील जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ आहे.येथे येणारे पर्यटक जोडप्या सोबत येऊन कोल्ड्रिंक, पिण्याचे पाणी,पायात असलेली चप्पल, मदिरापान करणारे पर्यटक यामुळे येथील पावित्र्य धोक्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकारने सकल जैन समाजाच्या धार्मिक भावनेची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी या पवित्र स्थळाला जैन धर्माचे तीर्थ स्थळ म्हणून घोषित करावे असे ही शेवटी निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुक्यातील सकल जैन समाज उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.