आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र मैत्रिणीं भेटल्याचा आनंद:संस्कार प्रबोधिनी विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत ; रामदास कुलकर्णी यांनी केले आयोजन

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपावली सुटीनंतर संस्कार प्रबोधिनी विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. दीपावली सुट्टीनंतर द्वितीय सत्रामध्ये संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी केले होते.

स्वागत आणि विद्यार्थी ही भारावले होते. दीपावलीच्या २२ दिवसाच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्रांगणात किलबिलाट ऐकायला मिळाला. २२ दिवसानंतर मित्र मैत्रिणीं भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मधल्या सुट्टीत मध्यान भोजन करताना दिवाळी सुट्टीतील अनुभव एकमेकांना सांगताना आणि गुजगोष्टी करताना विद्यार्थी दिसत होते. विद्यार्थ्यांवर पुष्पृष्टी करताना शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वाघ, किरण धुळे, रेखा हिवाळे, कीर्ती कागबट्टे, शारदा दहिभाते, अश्विनी काळे, स्वप्नाजा खोत, माणिक राठोड, रशीद तडवी आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाचे शाळेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख, प्रा.राम भाले, विनायकराव देशपांडे, प्रा. केशरसिंह बगेरिया आदींनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...