आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवनाशी एकरूप होण्याची गरज‎

जालना‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात एकमेकांना‎ सहकार्य करणारे लोक असतात,‎ तसेच गावामधील संस्कृती ही एक‎ आदर्श संस्कृती असते, तिचा‎ विद्यार्थ्यांनी नीट अभ्यास करून.‎ गावातील समस्या ओळखून त्या‎ सोडविण्याचा प्रयत्न करावा आणि‎ गावाचा विकास साधावा, असे‎ मत परिवर्तन एज्युकेशन‎ सोसायटीचे सचिव अॅड. ब्रह्मानंद‎ चव्हाण यांनी केले.‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मराठवाडा विद्यापीठ आणि‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य‎ महाविद्यालयाने जालना‎ तालुक्यातील सामनगाव तेथे‎ आयोजित केलेल्या ग्रामीण‎ शिबिरात ते बोलत होते.

शिबिराचे‎ उद्घाटन सिनेट सदस्य प्रा.‎ चत्रभुज गोडबोले यांच्या हस्ते‎ करण्यात आले. यावेळी डॉ.‎ प्रविण कनकुटे, कांबळे यांच्यासह‎ आदींची उपस्थिती होती. ग्रामीण‎ शिबिराचे आयोजन महात्मा‎ जोतिबा फुले समाजकार्य‎ महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत कुमार‎ वनंजे यांनी केले. सूत्रसंचालन‎ वैशाली साळवे यांनी तर संदेश‎ म्हस्के यांनी आभार मानले.‎ यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी,‎ ग्रामस्थ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...