आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा:तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत रेणुकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकादेवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करून संस्थेची बहुमान राखला आहे. त्यामुळे यश सपादंन केलेल्या खेळाडूंचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

भोकरदन येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी राजेश जगताप थाळीफेक मध्ये द्वितीय, गणेश सोनवणे भालाफेक द्वितीय, आचल चंद्वाडी २०० मिटर व दिव्या सोनवणे २०० मिटर लांब उडी द्वितीय, कवीता शिंदे ४०० मिटर लांब उडीमध्ये द्वितीय, गोळा फेक मध्ये पूजा नरवाडे हिने द्वितीय क्रमांक मिळवीला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे रेणुकादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वंसतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अरुण देशमुख, ताराचंद आहेर, डी. एस. देशमुख, पि. एम. पवार, ए. सी. देशमुख, एम. के. देशमुख, सुदेक्षणा राव, डी. ए. नरोटे यांच्यासह विजेत्या विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती. या विद्यार्थ्यंाना पुढील स्पर्धांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेकडून मिळाले.

बातम्या आणखी आहेत...