आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणातील प्रवाह:विद्यार्थ्यंाना प्रा. बनसोडेंचे शैक्षणिक पाठबळ

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागते, तर अंगी गुणवत्ता असतानही शिक्षणातील प्रवाह बदलून काम करावे लागते. अशी परिस्थिती गुणवंतांवर येऊ नये, यासाठी येथील प्रा. निवृत्ती बनसोडे हे मागील २० वर्षापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मदत करत आहे. त्यांनी सोमवारी शिक्षक दिनी महाविद्यालयीन विद्यार्थीनींना पुस्तकाची मदत केली.

अनेक विद्यार्थी असे आहेत की, ते शिक्षण क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करतात. मात्र, घरच्या गरीब परीस्थितीमुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपुर्ण राहते, तर काहीजण मोलमजुरी करुन शिक्षण घेतात यात शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी त्यांच्याकडे शैक्षणिक साहीत्य घेण्यासाठी पैसे नसतात. तर कधी शाळा काॅलेजचा गणवेश नसतो. ही विद्यार्थ्यांची समस्या पाहुन येथील बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव प्रा. निवृत्ती बनसोडे हे मागील २० वर्षापासून गरीब, कामगार कष्टकरी, जिज्ञासू होतकरु विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात विविध समस्यांना तोंड देत उल्लेखनीय कार्य करत असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतात. त्यांना दोन वर्ष शिक्षणासाठी शालेय साहीत्य तथा शाळा महाविद्यालयाचा गणवेश यासह आदी साहीत्य पुरवतात.

दरवर्षी १० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारतात. आता पर्यंत त्यांनी ५०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे पालकल्व स्विकारलेले असून ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधत त्यांनी ५ महाविद्यालयीन विद्यार्थींनीच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी संजीवनी मोकळे ११ वी विज्ञान, आरती भदरगे १२ वी विज्ञान, दिपाली बनसोडे ११ वी विज्ञान व कन्या वाघ ११ वी कला या नामाकिंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जिज्ञासु व कला क्रीडा साहीत्य संशोधनात अग्रेसर असलेल्या विद्यार्थींना शैक्षणिक साहीत्य दिले. दरम्यान, आम्ही लहान असतांना आमच्या घरची परीस्थिती, हालाखीची होती. कमवा आणि शिका अशा परीस्थितीत गावापासुन दिड दोनशे किलोमिटर दुर राहुन शिक्षण घेतल

त्यातच शिक्षणासाठी पुरेपुर साहीत्य नसत मग वर्ग मित्रांकडून साहीत्याची जुळवाजुळव करीत शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पुर्ण व्हायचा मात्र कठीण परीस्थितीतही शिक्षणाला खंड पडू दिला नाही. त्यात जिद्द धाडस आणि चिकाटीने अभ्यास केला व मनात शिक्षक पुढे प्राध्यापक होण्याचे ध्येय मनात ठेवले व गरीब कामगार कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेतांना येणाऱ्या अडचणीत मदत करण्याचे काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...