आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांनी उद्योजकतेचेही ज्ञान घ्यावे

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थांनी आपल्या शिक्षणा सोबतच उद्योजकतेचे ज्ञान सुद्धा घेणे महत्वाचे आहे. याचा भविष्यात निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. गोवर्धन मुळक यांनी केले.

भोकरदन येथील मोरेश्वर महाविद्यालयात आयोजित उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होेते. दोन दिवसीय कार्यशाळेत एकूण सहा सत्र झाले. पहिल्या सत्रात डॉ. सत्यकुमार राठी यांनी विद्यार्थांनी उद्योग करित असतांना त्या मध्ये तंत्रज्ञान कसे फायद्याचे आहे हे पटवून दिले. दुसरे सत्र डॉ. भरत पिंपळे यांनी केले. आजच्या स्पर्धेच्या काळात जर व्यवसायात टिकून व्यवसाय व उदयोग करायचा असेल तर तंत्रज्ञाना बरोबर भांडवल देखील महत्वाचे आहे. यात शिशु योजना, किशोर योजना, तरुण योजना याविषयी महत्व व फायदे पटवून दिले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्रात डॉ. विठ्ठल गायकवाड यांनी भौतिक शास्त्रीय संकल्पना उद्योगात कश्याप्रकारे महत्वाच्या व फायद्याच्या असतात यावर मार्गदर्शन केले. दुसरे सत्र डॉ . हर्षल पाटील यांनी गुंफले. त्यांनी आयुर्वेद आणि उद्योग यांचे महत्व स्पष्ट केले. यात त्यांनी आजच्या या जीवन शैलीत आरोग्याच्या समस्या उद्भवतात म्हणून विद्यार्यांनी उद्योग व्यवसाय जर करायचा असेल तर आयुर्वेद या क्षेत्रात उद्योग व्यवसाय केला पाहीजे असे सांगितले.

तिसरे सत्रात डॉ. राम कदम यांनी लहान व मध्यम उद्योग देशाला कसे फायद्याचे असतात व त्यातून कश्या प्रकारची रोजगार निर्मिती होते हे स्पष्ट केले. यात त्यांनी अनेक उद्योजकाचे उदाहरणे दिली. चौथे आणि शेवटचे सत्रात डॉ. सतीश ढोके यांनी विद्यार्थांना उद्योजक होण्यासाठी विद्यार्थांनी प्रथम जोखीम घेण्याची तयारी करावी. तसेच भांडवल व्यवस्थापान करावे आणि येणाऱ्या समस्याचा सामना करण्याची तयारी ठेवावी असे सांगितले. कार्यशाळेचा समारोपात प्राचार्य डॉ. भगवान डोंगरे यांनी विद्यार्थांनी नोकरी न मिळाल्यास निराश न होता उदयोग व्यवसाय सुरू करावा, यासाठी त्यांनी अनेक उद्योगपतीचे दाखले दिले. आपण नोकरी करणारे न होता नोकरी देणारे उद्योजक व्हावे, या कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन उद्योग व्यवसायाकडे वळण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे सांगितले. डॉ. भरत पिंपळे यांनी अाभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी पालक आदींची मोठया संख्येने उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...