आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी शिक्षणक्रम घेताना विद्यार्थ्याने चौकस राहावे, प्रश्न उपस्थित करावे, निरीक्षण करावे व वाचन करून आपल्या शब्दात शेतीविषयी ज्ञानाचे शब्दांकन करून ते ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. अन्न सुरक्षिततेसाठी पूर्ण जगाचे लक्ष शेतीमुळे भारताकडे लागून आहे व हा कधीही बंद न पडणारा कारखाना आहे. त्यामुळे या कृषी क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेसाठी व आशावादी राहावे, असे आवाहन निवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी केले.
मुक्त कृषी शिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे सोमवारी कृषी प्रमाणपत्र व पदविका शिक्षणक्रमाच्या प्रथम संपर्कसत्र उदघाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी निवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने, कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी, प्रा.राहुल चौधरी, प्रा.पंडित वासरे, प्रा.सुनील कळम यांची उपस्थिती होती. नंदकिशोर पुंड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मन, बुद्धी व संस्कार याचा समतोल साधून आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करावा.
विद्यार्थ्यांनी कृषी कौशल्य आत्मसात करून त्याचा उपयोग स्वतःच्या शेतीमध्ये करून आर्थिक उत्पन्न वाढवावे व सर्वांगीण विकास साधावा. प्रास्तविकात केंद्रप्रमुख प्रा. एस. व्ही. सोनुने यांनी मुक्त कृषी शिक्षणक्रमाचे महत्त्व भविष्यातील वाव व शिक्षण पद्धती यावर माहिती दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तांत्रिक सत्रात मार्गदर्शक प्राध्यापकांनी अभ्यासक्रम व संपर्कसत्र, कृषी शिक्षणक्रम पद्धती या विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.अजय मिटकरी यांनी केले, तर प्रा. राहुल चौधरी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.