आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:विद्यार्थ्यांनी नोकरीकडे सेवा म्हणून बघत चरित्र कमवावे

बदनापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नये, नोकरीकडे सेवा म्हणून बघून चरित्र कमवा.जीवनात हजारो संधी ऊपलब्ध होत असतात फक्त आपल्याला प्रत्येक संधीला शेवटची संधी म्हणून तिचे सोने करता आले पाहिजे, असे प्रतिपादन जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. सोमिनाथ खाडे यांनी केले.

बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील स्वामी विवेकानंद आश्रमात समर्थ अकँडमी मधील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरूण-तरूणीना मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना विवेकानंदाचे मन आणि त्याची शक्ती हे पुस्तके भेट देण्यात आली. माजी प्राचार्य धनंजय पाटील, निकेश मदारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आश्रमाचे सदस्य प्रा.डॉ. मोहन शिंदे, कृष्णा चौधरी, पवन खांदवे, संतोष खांदे, मीनाक्षी देशमुख, नारायण भुजंग, चत्रभुज आनंदे, प्रा. योगेश कोळी यांच्यासह विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...