आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:विद्यार्थ्यांनी परीक्षेला भयमुक्त सामोरे जावे; मुख्याध्यापक निवृत्ती दिवटे यांचे आवाहन

जाफराबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रा बरोबरच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.परंतु शिक्षण ही काळाची गरज ओळखुन विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय नजरे समोर ठेवुन तसेच कठोर परीश्रम करुन कॉपी व भयमुक्त परीक्षेला सामोरे जावुन यश संपादन करावे, असे आवाहन मुख्याध्यापक निवृत्ती दिवटे यांनी केले.

जाफराबाद येथील ज्ञानसार माध्यमिक विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप देण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य विलास नवले, शालीनी बकाल, प्रशांत अंभोरे, निवृत्ती वायाळ, सुजीत सोनोने, आप्पासाहेब सपाटे, रमेश उखर्डे, गजानन वायाळ, अजीत म्हस्के, कैलास चिंचोले आदींची उपस्थिती होती. मुख्याध्यापक दिवटे म्हणाले, शालेय जीवनात शांतता व संयम हा सर्वात महत्वाचा गुणधर्म असुन विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतुन यश संपादन करावे. शिवाय विद्यार्थ्यांनी राहणीमानाची पेक्षा शिक्षणात स्पर्धा करुन उच्चांक गाठावा, असे आहवान केले.

यावेळी एस.बी.पाटील, श्रीकृष्णा वानखेडे, गजानन वायाळ, बी. पी. शेळके, आनंता कळंबे, शहादेव ईलग, ललिता रोडगे, दिपाली बन्सलवाल, मंजुषा आत्राम, सुनिता भोसले, भास्कर जाधव, समाधान टेकाळे, संजय जोशी, दिलीप काळे यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल अंभोरे, काजल चंदवाडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...