आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेविषयक जागृती:विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून कायद्याचा अभ्यास करणे गरजेचे

पिंपळगाव रेणुकाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्याला कायदा समजतो तो कुठेही न डगमगता ताठ मानेने बोलू शकतो. यासाठी सामाजिक जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच शिक्षणासोबत कायद्याचा देखील अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील सरस्वती विद्यालयात कायदेविषयक जनजागरुता मोहीम संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती. मोरे म्हणाले, आजचे विद्यार्थी हे अपयशाने खचुन जातात परंतु आपण इतिहास चाळला तर ज्या लोकांना जिवनात अनेक वेळा अपयश पत्कारावे लागले त्यांनीच इतिहास घडवला आहे. आज शाळेत त्यांचेच धडे आपण वाचतो आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत करुन यशस्वी झाले पाहीजे. कारण जे साबणाने आंघोळ करतात ते केवळ कपडे बदलत असतात आणि जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलत असतात.

बरेच विद्यार्थी अपयश आले म्हणून आत्महत्या सारखे पर्याय निवडतात. परंतु हे साफ चुकीचे आहे.एकदा अपयश आल्याने कुणी संपत नसतो. त्यासाठी पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न केले पाहीजे. कारण जीवनात अशक्य असे काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला राञीचा दिवस करावा लागेल. असे सांगून विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम, अपघात, महिला सुरक्षा, सायबर क्राईम, सामाजिक व शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नामदेव लोखंडे, डि. टी. खंडाळकर, विजय डोंगरे, दिपक गोरे यांच्यासह आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन मनोज देशमुख यांनी तर नामदेव लोखंडे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...