आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक आनंदी दिवस विशेष:हसत-खेळत शिक्षणाद्वारे विद्यार्थी राहणार आनंदी, राज्यात 300 आदर्श शाळांची होणार निर्मिती

जालना / प्रताप गाढेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलच्या आहारी जाऊन शालेय विद्यार्थी आभासी दुनियेत रमत असल्याने त्यांच्यात एकटेपणा वाढतो आहे. हसत-खेळत शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना आनंदी ठेवले तर त्यांचा शैक्षणिकच नव्हे, सर्वांगीण विकास होणार आहे. हेच तत्त्व समोर ठेवून आता राज्यात जि.प.च्या ३०० आदर्श शाळांची निर्मिती करून प्रयोग राबवला जाईल. याअंतर्गत आता आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी आणि विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील.

२० मार्च रोजी जागतिक आनंदी दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ही मोठी भेट म्हणावी लागले. नकारात्मकता वाढून सध्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकाराला आळा बसावा म्हणून आनंददायी शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी कृतियुक्त शिक्षण दिले जाणार आहे.

अशा आनंदी शाळांतून सकारात्मकता वाढते...
राज्यात वाबळेवाडी मॉडेल आनंदी शिक्षण देणारी शाळा हे उत्तम उदाहरण आहे. त्यात मुलांना प्रेरित करणे, मुले स्वत: शिकत असताना ते गतीने शिकतील यासाठी पाठपुरावा, गट जोडीने शिकणे असे प्रयोग असतात. यातून निश्चितपणे सकारात्मकता वाढेल. -नंदुकमार, माजी शिक्षण प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य.

विद्यार्थ्यांसाठी काय असतील सुविधा?
- शाळांसाठी आकर्षक इमारत, क्रीडांगण, साहित्य, आयसीटी व विज्ञान प्रयोगशाळा असतील.
- शैक्षणिक सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या चौकटीबाहेरील शिक्षण दिले जाईल.
- वाबळेवाडीसारख्या शाळांनी राबवलेल्या अनोख्या प्रयोगाचा अभ्यासही शिक्षक करणार.
- राज्यच नव्हे तर राज्याबाहेरील उत्कृष्ट असे शैक्षणिक प्रयोगही पाहण्यासाठी शिक्षक जाणार.
- वाचनावर विशेष भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना शिकवल्या जाणार.
- आयसीटी लॅब, ग्रंथालयांमध्ये पूरक शिक्षण देणारी पुस्तके, विश्वकोश उपलब्ध असतील.

बातम्या आणखी आहेत...