आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल आराखडा:तीन नद्यांच्या समस्या सोडवण्यासाठी होतोय अभ्यास

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने “चला जाणूया नदीला’ या अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील प्राथमिक टप्प्यात पाच नद्यांचा अभ्यास केला जात आहे. यासाठी जिल्हास्तरीय तीन नद्यांचा अभ्यास केला जात आहे. हा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० जानेवारी २०२३ पर्यंत जल आराखडा सादर करावा लागणार आहे. जिल्ह्याला येणाऱ्या एकूण विकास निधीच्या १० टक्के निधी हा या नद्यांच्या अभ्यासासाठी खर्च केला जाणार आहे.

नद्यांमध्ये, जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता, साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या अनुषंगाने विविध जिल्ह्यांतील नद्यांचाही अभ्यास केला जात आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील सीना, जिवरेखा, कुंडलिका या नद्यांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी समन्वयक म्हणून उदय शिंदे, विष्णू पिवळ, अजित गोखले, एम. डी. सरोदे, सुरेश केसापूरकर यांची नेमणूक केलेली आहे. चला जाणूया नदीला या अभियानातून नदीसाक्षर होण्याचा संकल्प केल्यास खऱ्या अर्थाने आपल्या नद्या अमृतवाहिन्या होण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

अभियानाचे हे आहे उद्दिष्ट
नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरिकांच्या सहकार्याने नदीचा सर्वंकष अभ्यास करणे, अमृतवाहिनी बनवण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रूपरेषा आखणे, नदीचा तट, प्रवाह जैविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार-प्रसाराबाबत नियोजन करणे आदी उद्दिष्ट यांत समाविष्ट आहेत.

बातम्या आणखी आहेत...