आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टंटबाजी:पिस्टल घेऊन स्टंटबाजी; गुन्हा दाखल

अंबड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिपू सुलतान मिरवणुकीदरम्यान दुसऱ्याच्या खांद्यावर बसून एका हातात पिस्टल आकाशाकडे करून दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेख बिलाल शेख दिलावर (२५, महेबूबनगर, अंबड) असे त्याचे नाव आहे‌. यासंदर्भात विष्णू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या मनात भिती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा स्टंट केल्या जात असल्याचे पोलिसांनी नमुद केले आहे.

मिरवणुकीत काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. शस्त्र बाळगणारा हा मिलिटरीत नोकरीस असल्याचे सांगण्यात आले. परवाना आहे मग तो सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित करुन ही कारवाई केली आहे. मिरवणुकीतून दहशत निर्माण करणाऱ्यावर स्टंटबाजावर तत्काळ कारवाई केल्यामुळे पोलिसांचे अंबडकरांनी कौतूक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...