आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय उत्सव, लोकोपयोगी उपक्रमांसाठी उद्योजक सुभाषचंद्र देवीदान यांनी सदैव मदतीचा हात पुढे केला असून त्यांचे दातृत्व अधिक बळकट व्हावे. अशा सदिच्छा मनोज महाराज गौड यांनी व्यक्त केली. अग्रविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मंगळवारी सायंकाळी बडी सडक स्थित श्रीराम मंदिर येथे सुभाषचंद्र देवीदान यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प. पू. मनोज महाराज गौड यांनी आशीर्वचन दिले. संस्थानचे विश्वस्त श्रीनिवास भक्कड, नितीन बागडी, किशोर पंजाबी, संजय राठी, सुरेश लाला, राजेंद्र राठी, सुरजप्रसाद शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनोज महाराज गौड यांनी सुभाषचंद्र देवीदान यांना अग्रविभूषण पुरस्कार मिळणे ही समस्त जालनेकरांसाठी गौरवास्पद बाब असून मारवाडी मंच, सुंदरकांड परिवार च्या प्रत्येक उपक्रमात ते सदैव अग्रभागी असतात. तर सुभाषचंद्र देवीदान यांनी भगवंत कृपा व संतांच्या आशीर्वादाने हे सामर्थ्य प्राप्त झाले असून समाजाने आपल्या कार्यांची दखल घेतली. असे नमूद केले. सुञसंचालन नितीन बागडी यांनी केले. यावेळी सत्यनारायण गुडवाला, संजय नागोरी, सतीश भक्कड, प्रमिला मंत्री, अनिल ठक्कर, रघुनंदन मानधना, अनिल व्यवहारे, राजेश्वरी जोशी, छाया नंद, शोभा अग्रवाल, छाया आर्य आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.