आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतवर्षातील खरीप हंगामात अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या ३ लाख ६९ हजार ६८० शेतकऱ्यांपैकी दीड लाख बाधितांची बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांकासह इंग्रजीतील यादी शासनाला पाठवली असून उर्वरीत सव्वादोन लाख लाभार्थींची यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहेत. लवकरात-लवकर हे काम पुर्ण करून याद्या पाठवल्या जाणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी खरिपानंतर रब्बीही हंगाम अर्ध्यावर येऊनही मदत मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. बाधित शेतकऱ्यांचे पीक पचंनामे करून त्याचा अहवाल शासनाला पाठवून अनुदानाची मागणी करणे ही नेहमीची प्रक्रिया. यानुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल पाठवले, बाधित शेतकऱ्यांच्या याद्या बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकासह तयार केल्या. शासनाकडून अनुदान आले की तहसीलमार्फत याद्या व सोबत चेक पाठवून देत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याचे आदेश देण्यापर्यंत तयारी झाली होती.
मात्र, यातच सरकारने नवा फतवा काढत थेट बाधितांच्या याद्या मागवल्या. बाधित शेतकऱ्यांचे आधार क्रमांकावर नमुद असलेले नाव, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, बाधित क्षेत्र अशी इत्थंभूत माहिती इंग्रजीत तयार करून पाठवण्याचे फर्मान सोडले. यानुसार मागील तीन आठवड्यांपासून त्या-त्या गावचे तलाठी याद्या अपडेट करण्यात व्यस्त आहेत. यात पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे पाठवल्या असून उर्वरीत याद्यांचे कामही वेगाने सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
याद्या तयार करण्याचे काम गतीने सुरू
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्यातून पुढे आलेले असून, त्याची यादी तयार आहे. मात्र, शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार नव्याने याद्या तयार केल्या जात आहेत, त्यापैकी ४० टक्के शेतकऱ्यांची माहिती शासनाला पाठवली असून, उर्वरीत याद्याही लवकरच तयार होतील. -केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.