आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र व राज्य सरकारने नुकतीच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९९ रुपयांनी कपात केली आहे. तसेच उज्ज्वला गॅस योजनेतून २०० रुपयांची सबसिडी देण्यात आली आहे. परंतु, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कमी करून त्यावरील बंद केलेली सबसिडी पुन्हा एकदा सुरू करावी, अशी मागणी सर्वसामान्यांतून केली जात आहे. मागील तीन वर्षांपासून मिळणारी गॅस सबसिडी सरकारकडून सध्या बंद करण्यात आली आहे. त्यातच दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, विजेचे वाढणारे बिल यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. आता जगावे तरी कसे हाच प्रश्न त्यांना सतावत आहे.
याबाबत शासनाने निर्णय घेणे आवश्यक आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. देशातील ९ कोटी ५९ लाख उज्ज्वला लाभार्थ्यांना याचा फायदा होत आहे. ही सबसिडी १ मार्च २०२३ ते १ मार्च २०२४ पर्यंत असणार आहे. वर्षभरात या योजनेतील लाभार्थ्यांना १२ सिलिंडर मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असल्याचे माजी नगराध्यक्षा आशा माळी यांनी सांगितले. तर बस हो गई महगाई की मार, अबकी बार मोदी सरकार'' अशा निवडणुकीतील घोषणा फोल ठरल्या आहेत.
घरगुती गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने यावर काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्वादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा डॉ. सुनिता सावंत यांनी केली आहे. जुलै २०२१ पासून तब्बल पाचवेळा गॅसची दरवाढ झाली आहे. यामुळे खर्चाचे नियोजन बिघडले आहे. त्यात नुकतेच वीज दरही वाढले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.