आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविवाह:दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश; बालविकास विभागाने वेगाने चक्रे फिरवत दोन पथके तयार करून हे बालविवाह विभागाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील गोंदेगाव तर घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास विभागाने वेगाने चक्रे फिरवत दोन पथके तयार करून हे बालविवाह विभागाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश आले.

गोंदेगाव येथे विवाह होत असलेल्या मुलीचे वय १६ तर मच्छिंद्रनाथ येथील मुलीचे वय १७ वर्षे आढळून आले. दोनही ठिकाणी मुलींच्या आईवडिलांना नोटिसा देण्यात येऊन बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती देत १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच सदर मुलीचे लग्न करू असे हमीपत्र भरून घेण्यात आले.

गावकरी, नातेवाईक, मंडप, डेकोरेशन, बँडबाजावाले यांना देखील माहिती देण्यात आली. बालविवाहाला उपस्थित मंडळी देखील तेवढीच जबाबदार असल्याची जाणीव करून दिली. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, दामिनी पथक प्रमुख रंजना पाटील, आरती साबळे, चाइल्डलाइनचे संतोष दाभाडे, सागर सोनवणे, ग्रामसेवक तथा कानडजे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...