आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सेंट मेरीज हायस्कूलच्या गोल्डन ज्युबिली वर्षानिमित्त आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, रेवगाव येथील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून देशभक्तिपर आधारित उत्कृष्ट चित्रांचे रेखाटन केले.
या स्पर्धेत शाळेतील श्रावणी जाधव, साक्षी पाखरे, तृप्ती कोपरगे, अक्षरा चोकनपळे, समृद्धी गायकवाड, श्रृती सरडे, ऋतुजा शेळके, दीपिका मुळक या मुलींच्या संघाने तर सार्थक गोल्डे, रोहित चव्हाण, वैभव मोरे, राजवैभव फिरंगे व ऋतुराज जाधव या मुलांचे संघाने उत्कृष्ट चित्र रेखाटले. या विद्यार्थ्यांना प्राचार्य पुनम खेडवाल, प्राचार्य अभय गायकवाड, संस्था प्रतिनिधी नारायण गोल्डे व इतर सर्व शिक्षक-शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याप्रसंगी मेस्कोचे प्रदेशाध्यक्ष तथा शिक्षणतज्ञ गजानन पाटील वाळके यांचे हस्ते यशस्वी सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन पाटील यांनी सांगितले की खरी गुणवत्ता ग्रामीण भागामध्येच ठासून भरलेली आहे, मात्र मार्गदर्शनाच्या अभावाने हि ग्रामीण भागातील गुणवंत व प्रतिभावंत मागे राहिलेली आहे. मात्र आता मेस्को अर्थात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ओनर्स असोसिएशनने ग्रामीण भागात देखील गुणवत्ता वाढीसाठी ठोस पाऊल उचललेले असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.