आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्ती:संघर्ष समितीच्या मागणीला यश, रामनगर मानेगाव रस्त्याची दुरुस्ती सुरू

रामनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील रामनगर ते मानेगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही याकडे प्रशसन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नव्हते.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मानेगाव व रामनगर परिसरातील सर्व गावचे सरपंच व युवा कार्यकर्ते यांनी संघर्ष समितीची स्थापना करून जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले सर्वजनिक बांधकाम विभागाने संघर्ष समितीस रामनगर ते मानेगाव रस्ता दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन दिले व सोमवारी रस्ता दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...