आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जाफराबाद तालुक्यात ऊसतोडीला सुरुवात ; कामगारांच्या टोळ्या परिसरात झाल्या दाखल

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यांमध्ये ऊस तोडीला प्रारंभ झाला. विविध कारखान्यांच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या परिसरात दाखल झाल्या आहेत. जाफराबाद तालुक्यांमध्ये ३ हजार हेक्टरवर उसाची लागवड केली जाते. खडकपूर्णा प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे कुंभारझरी, आळंद, निमखेडा, हनुमंतखेडा, ब्रह्मपुरी, मंगरूळ, डोलखेडा, नळविहीरा, खामखेडा, हिवरा काबली, खानापूर आदी शिवारामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे या भागावर ऊस कारखान्यांची नियमित नजर असते. ३००० हेक्टर वरील जवळपास एक लाख टन उसाचे गाळप भोकरदन जाफराबाद चा रामेश्वर सहकारी साखर कारखाना करतो, तर मुक्ताई जळगाव येथील कारखाना व कन्नड येथील कारखाना जवळपास प्रत्येकी एक लाख टन ऊस गाळपसाठी तालुक्यातून उचलतो.

या शिवाय सिल्लोड, धाड येथील कारखानेही तालुक्यातून ऊस नेतात. सद्यस्थितीत या कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या परिसरात दाखल झाले आहेत. आळंद परिसरामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सिल्लोड यांचे ऊसतोड कामगार दाखल झाले असून ऊस तोडीलाही प्रारंभ झाला आहे. दरम्यान, गतवर्षीपासून हार्वेस्टरनेही परिसरात ऊस तोडणी केली जात आहे. दरम्यान, ऊस क्षेत्रावर असलेल्या लोंबकलेल्या वीजतारांमुळे अनेकदा घर्षण होऊन ऊस आगीच्या भक्षस्थानी पडल्याच्या घटना गतवर्षी मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. जवळपास २०० एकर वरील व ऊस आगीत जळाला होता. यामुळे विविध क्षेत्रावर असलेल्या विजतारा ओढून घ्याव्यात, अशी मागणी हनुमंतखेडा येथील ऊस उत्पादक सुधीर भोपळे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...