आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस उत्पादक हतबल:तोडणी होत नसल्याने आष्टी परिसरात ऊस उत्पादक हतबल; पावसाळा तोंडावर येऊन ठेपला तरी कारखान्याकडून ऊस नेन्यास दिरंगाई

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरवशाच पिक मानले जाणाऱ्या ऊसाचे पिक आष्टी परिसरात अतिरिक्त झाल्याने पावसाळा तोंडावर येऊन ठेपला तरी कारखान्याकडून ऊस नेन्यास दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकरी स्वत: तोड करून आपला ऊस कारखान्या पर्यंत पोहचवत आहेत. यासाठी मजूरांकडुन एकरी चाळीस हजार रुपये घेतले जात असून शेतात उभा राहील या भीतीने ना विलाजाने शेतकरी दाम मोजून ऊस तोडणी करीत आहेत.

सततच्या पावसामुळे आष्टी परिसरातून वाहणाऱ्या डावा कालवा आणी गोदावरी नदीच्या पाण्यामुळे सिंचन क्षेत्र वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत ऊसाची लागवड केली. यासाठी परतुर येथील बागेश्वरी साखर कारखाना, कुंभारी पिंपळगाव येथील समृद्धी साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात नोंदी घेण्यात आल्या होत्या. मात्र नोंदीची तारीख होऊन चार चार महिने उलटुन ही कारखान्या कडून ऊसाची तोड होत नसल्याने त्यातच पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस कसा घालावा, अनेक शेतकरी कारखान्याच्या टोळीची वाट न पाहता स्वत: मजुर लाऊन ऊस तोडीत आहेत.

यासाठी मजूरही शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. तोडीसाठी एकरी चाळीस हजार रुपये घेत आहेत नसता जोडीला १२०० रुपये रोज असा भाव ठरलेला असून एकंदरीत उत्पादन पेक्षा खर्च अधिक होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत अद्याप ही परीसरात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असून शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...