आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस उत्पादक:ऊस उत्पादकांनी ई-पीक पाहणी ॲपमध्ये पिकाची नोंद करावी

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यामध्ये ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपमध्ये करण्याच्या सूचना साखर आयुक्तांमार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपमध्ये करण्याच्या सूचना दिल्या असून, सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या ॲपवर जिल्हा, तालुका, गाव व गटनंबर, नाव निवडून स्वत:च्या शेतामध्ये घेत असलेल्या पिकांची नोंद करावी. एका मोबाईलवर ५० शेतकरी ई-पीक पहाणी ॲपद्वारे पिकाची नोंद करू शकतात. साखर कारखान्यांकडे ऊस नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाच्या नोंदी कराव्यात.

साखर कारखान्यांनी आपल्या शेती विभागाच्या मदतीने ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाच्या नोंदीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मोहिमेचे आयोजन करत शेतकऱ्यांना माहिती देऊन कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ॲपद्वारे गाव नमुना नंबर १२ (सातबारा) मध्ये ऊस पिकांच्या नोंदी करुन घ्याव्यात. जेणेकरुन अचूक ऊस पीक क्षेत्राचा अदांज करता येईल व कारखान्यांनाही नक्की किती ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, याचीही माहिती मिळेल. तलाठी व कृषी सहाय्यकांची यासाठी मदत घ्यावी, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...