आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन करून आत्महत्या:मुलाच्या उपचाराचा खर्च पेलवत नसल्याने आत्महत्या

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाच्या दवाखान्याचा खर्च पेलवत नसल्याने एका शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील वडगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. राजू राठोड असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव आहे. तो बाजीउम्रद येथील रहिवासी आहे. राजू राठोड यांना एक सुमीत नावाचा दहा वर्षांचा मुलगा आहे. मात्र त्याच्या डोक्यात गाठ असून त्याला उपचारासाठी औरंगाबादला न्यावे, अशा सूचना जालन्यातील डाॅक्टरांनी दिल्या होत्या. पण मुलाच्या औषधोपचाराचा खर्च राठाेड यांना पेलवत नव्हता. त्यामुळे हताश झालेल्या राजू यांनी वडगाव येथील शेतमालकाच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...