आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उन्हाळी मशागतीची कामे यंत्रांच्या साह्याने, मजुरांची कमतरता; नांगरणी करण्यासाठी बैलजोडीची जागा घेतली ट्रॅक्टरने, जास्त पैसे मोजूनही मजूर मिळेना, शेतकरी त्रस्त

तळणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिना संपून मे महिना प्रांरभ झाला. शेतातील मशागतीची कामे चालू झाली असुन परंतू उन्हाळी मशागतीच्या कामे हे यंञणेच करावी लागत आहे. मजुराअभावी शेतकऱ्यांना शेतीची कामे ट्रॅक्टर ने केल्याशिवाय पर्याय राहीला नाही पूर्वी नागरट करायची झाल्यास कुठे चार तर कुठे सहा बैलाचे नागर दिसत आता हे चिञ शहर परिसरात तर सोडाच ग्रामीण भागात पण दिसेनासे झाले आहे सालगड्याने अंशी हजाराच्या आकडा पार केला आहे.

त्यातच त्याच्या कामाच्या अटी व शर्ती लागू असतात म्हणासारखा महीना .मिळून सुध्दा जास्त मेहनीतीचे कामे सालगाडी करीत नसल्याने ती कामे टक्ट्ररच्या साहाय्याने करावी लागत आहे पाच दहा वर्षापूर्वीची परिस्थीती आता राहीलेली नाही मंजुराचे वाढते भाव त्याचे स्थलातर व वाढत्या तापमानाचा परिणाम या सर्व गोष्टीवर होत आहे शेतातील काडी कचरा वेचायला सुध्दा मजुराची मनधरणी करावी . लागत आहे काही शेतकरी रोटा व्हेटर करुन मशागत करून घेत आहे.

मजूर वेळेवर मिळत नसल्याने कोणतीच कामे वेळेवर होत नाही यांचा थेट परिणाम उत्पादन वाढीवर झाल्याचे दिसून येते शेतातील बैलजोडीची जी कामे आहेत त्याची जागा टॅक्टर ने घेतली आहे मोठया प्रमाणात शेतीचे कामे टॅक्टूर करीत आहे कापूस केळी हळद आद्रक अशा बोटावर मोजण्या ईतक्याच पिकांची लाव गड यंत्राने होत नाही ही कामे मजुराकडून करून घेतल्या जाते पेरणी झाली की अंतरगत मशागतीला पून्हा बैलाचा वापर महत्वाचा ठरतो बैला अभावी यातील आंतरगत मशागतीचे कामे करणे शक्य होत नाही.

आजच्या स्थितीत बैलांची कमतरता त्याची वाढलेली भाव सांभाळण्यांची मेहनत चारा टंचाईचे संकट यांचा आर्थीक हिशोब केला तर शेतकर्याला बैलजोडी ठेवायला परवडत नाही अशा परिस्थीतीत सुध्दा शेतकर्यानी आपली शेती परवडत नसली तरी टिकून ठेवली आहे कमी क्षेञफळ असलेले शेतकरी सुध्दा यञांच्या सहाय्यानेच शेती करताना दिसत आहे यांचा परिणाम अंतरंगत मंशागतीचे कामे वेळेवर न झाल्याने त्यांचा परिणाम उत्पादन वाढीवर होताना दिसुन येतो. याशिवाय शेतीत कामे करण्याची शेतमजूराची मानसिकता संपत चालल्याने मजुराचा तुटवडा निर्माण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...