आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रति वर्षाप्रमाणे या वर्षी देखील श्रीराम मंदिर विश्वस्त व श्रीराम सुंदरकांड सत्संग परिवार जालनाच्या वतीने नववर्षाचे स्वागत हवनात्मक १०८, श्री हनुमान चालीसाचे पठण पंडित मनोज महाराज गौड यांच्या वाणीतून पार पडणार आहे. 30 डिसेंबर रोजी श्रीरामाची भव्य शोभा यात्रा शहरातील मुख्य मार्गावरुन निघणार आहे. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता हॉटेल गॅलेक्सी सभागृहात १०८ हनुमान चालीसाच्या यज्ञ हवनासह पठणास प्रारंभ करण्यात येणार आहे.
त्यासाठी प्रत्येकाने आपल्या नावाची नोंदणी सुरजप्रसाद शुक्ला, नंदकिशोर इंदाणी, ओमप्रकाश जोशी यांच्याकडे करावी असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. गेल्या २४ वर्षांपासून हा उपक्रम सुंदरकांड परिवारातर्फे राबवण्यात येत आहे. नवीन पिढीतील तरूण- तरूणींना अध्यात्माची गोडी लागावी तसेच ते सर्व व्यसनापासून दूर रहावे त्याचबरोबर त्यांना या व्यसनापासून परावर्तीत करणे हा उदात्त उद्देश या कार्यक्रमामागे आहे. हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होणार असून यासबंधीची नियोजन बैठक श्रीराम मंदिर बडीसडक येथे झाली. या बैठकीत विविध समित्याचे गठण व नियोजन करण्यात आले. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम मंदिर विश्वस्थ मंडल व श्रीराम सुंदरकांड सत्संग परिवाराच्या वतीने करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.