आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५ जून रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता सभापती अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री राजेश टोपे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
सभापतिपदाचा अर्जुन खोतकर यांनी ७ जून २०१६ रोजी दुसऱ्यांदा पदभार घेतल्यापासून त्यांनी शेतकरी हा केंद्रबिंदू लक्षात घेऊन सुमारे ४८ वर्षांचा इतिहास असलेल्या कर्नाटक राज्यातील रामनगरम् येथील रेशीम कोष बाजारपेठेला रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने प्रेरीत होवून रेशीम कोष खरेदी केंद्राचा शुभारंभ करून रेशीम उत्पादक शेतक-यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. ३१ मे अखेर १७२४९ शेतक-यांनी त्यांचा १४२०० क्विंटल रेशीम कोष जालना बाजार पेठेमध्ये विक्रीसाठी आणलेला आहे,
ज्याचे बाजार मूल्य ५३ कोटी एवढे आहे. कोरोना जागतिक महारामीच्या काळात शेतकरी व इतर बाजार घटक तसेच शहरातील नागरिकांना अन्न धान्याची साखळी सुरु ठेवण्यांसाठी विशेष प्रयत्न करुन कृषि उत्पन्न बाजार समिती, जालनाची बाजार पेठ एक दिवसही बंद न ठेवता सुरुळीत चालु ठेवली. सचिव रजनीकांत इंगळे यांनी पदभार घेतल्यापासून त्यांनी सभापती यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे कामकाज करत कृषि उत्पन्न बाजार समिती, ३१ मार्च २०२१ रोजी कर्ज मुक्त केली. तसेच गेल्या सहा वर्षापासुन नियोजन करुन बाजार समितीच्या उत्पन्नाचा आलेख वाढवून बाजार समिती नफ्यामध्ये आणली.
शेतकरी, व्यापारी व इतर बाजार घटकांचा व्यापाऱ्याचा दृष्टीकोन लक्षात घेवून नवीन बाजार संकुलामध्ये भुसार, भाजीपाला, मोसंबी, डाळींब, गुळ, बारदाना, सीड्स, स्टील इतर शेतकरी व निगडीत सर्व व्यवसाय एकाच छताखाली आणून कृषी उत्पन्न बाजार समिती व जालन्याची ओळख शेतकरी व व्यापारी वर्गामध्ये निर्माण केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.