आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:चांगतपुरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता तौर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील चांगतपुरी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून सुनीता नीळकंठराव तौर यांची सरपंचपदी निवड झाली आहे. चांगतपुरी येथील श्री तुळजाभवानी ग्रामविकास पॅनलच्या द्रौपदी देवराव काळे, गोरख दिगंबर वीर, संगीता रमेश प्रधान, प्रदीप बाबासाहेब प्रधान, नंदा राजेभाऊ गायकवाड, गणेश कुंडलिकराव गुंजकर यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.

४४३ मतदार असलेल्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजयापासून दूर ठेवण्यासाठी अन्य पक्षांनी खूप प्रयत्न केले, परंतु मतदारांनी विकासाला मत देऊन श्री तुळजाभवानी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी केले आहे. आता आपण गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार, अशी प्रतिक्रिया नूतन सरपंच सुनीता तौर यांनी व्यक्त केली. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...