आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधीक्षक तपासणार:वैद्यकीय रजेवर असणाऱ्या पोलिसांचे प्रमाणपत्र पोलिस अधीक्षक तपासणार ; ठाण्यांसह विविध शाखांवर परिणाम

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय कारणांमुळे प्रत्येक पोलिस ठाण्यातून अधिकारी-कर्मचारी सिकमध्ये जातात. परंतु, यात काही जण डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट बनावट आणून या रजेचा फायदाही घेण्याचा प्रकार घडत असतो. जालना जिल्ह्यात अगोदरच पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यातच शेकडोंच्या संख्येने पोलिस सिकमध्ये आहेत. काही जण अनेक महिन्यांपासून याच रजेवर आहेत. याचा परिणाम ठाण्यांसह विविध शाखांवर होत आहे. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी सिकमधील असलेल्या कर्मचाऱ्यांना १८ जून‌ रोजी बोलावून घेतले आहे. त्या कर्मचाऱ्यांचे मेडिकल सर्टिफिकेटही तपासणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक शिंदे हे काही दिवसांपूर्वीच जालना शहरात रुजू झाले आहेत. पोलिस दलामध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिले काही दिवस शिंदे यांनी जिल्ह्यातील ठाणे निहाय गुन्ह्यांचा आढावा घेतला. आता सिकमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक, डीवायएसपी यांच्या बैठकीत सिकमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश तोंडी दिले होते. परंतु यानंतर कुणीही आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आता लेखी आदेश काढून शनिवारी सिकमधील कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आले आहे. कोण किती दिवसांपासून सिकमध्ये आहे, खरंच वैद्यकीय रजेची गरज आहे का, वैद्यकीय प्रमाणपत्र हे त्या अनुषंगाने आहे का या सर्व बाबींची तपासणी एसपी करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...