आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील पीरपिंपळगाव येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या तिच्या वडिलांनी, त्यांच्या नात्यातील व्यक्तींच्या साह्याने केल्याचे निष्पन्न झाले. ऑनरकिलिंग रोखण्यासाठी जनप्रबोधन मोहीम राबवावी, अशी मागणी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंनिसने पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रयोगशाळेचा अहवाल लवकर मिळवावा, सज्जड पुरावे मिळवावेत, दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयामार्फत केस चालवावी, चार्जशीट लवकर दाखल करण्यात यावे, समाजमनात कायद्याची जरब, धाक निर्माण होईल आणि भविष्यात असा अमानुष प्रकार करण्यास कोणी धजावणार नाही, यासाठी सखोल तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. असे या निवेदनात अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे, जिल्हाध्यक्षा वैशाली सरदार, राजू खिल्लारे, दिलिप शिखरे, कायदेशीर सल्लागार अॅड. राहूल बोबडे यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.