आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:नवदृष्टी महाअभियानांतर्गत 8 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया; 6 वर्षांपासून उपक्रम सुरू

तीर्थपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपक्रमघनसावंगी विधानसभा मतदारसंघातील जालना, अंबड व घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक गाव, वस्ती, तांड्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नवदृष्टी महाअभियानांतर्गत नेत्र तपासणी कॅम्प घेऊन मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे निदान झालेल्या १० हजार रुग्णांपैकी ८ हजार रुग्णांवर आजपर्यंत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

मागील ६ वर्षापासून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांमुळे मतदारसंघातील गरजू लोकांची सोय झाली आहे. पुणे येथील एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल व समता फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या नवदृष्टी महाअभियानांतर्गत १ जून रोजी घनसावंगी तालुक्यातील दैठणा व अंतरवाली टेंभी या गावातील ३० रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना करण्यात आले. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फोनद्वारे सर्व रुग्णांना प्रवासासाठी व शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दैठण्याचे गणेश पघळ यांनी वाहनचालकाचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...