आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व्हे:जालना-खामगाव रेल्वेमार्गाचा आजपासून सर्व्हे, रेल्वेचे अधिकारी 4 दिवस प्रस्तावित मार्गावर

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिशकालापासून प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वेमार्गासाठी अखेर सर्व्हे होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या या मार्गासाठी रेल्वेचे अधिकारी मंगळवारपासून ४ दिवस तालुक्याची ठिकाणे आणि बाजार समित्यांमध्ये फिरून माहिती घेणार आहेत.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती. मंगळवारपासूून मध्य रेल्वेचे पथक जालना-खामगाव लोहमार्गाची प्रत्यक्ष पाहणी करेल. ते प्रशासन, व्यापारिक संस्था आदींशी चर्चा करून आपला अहवाल रेल्वेमंत्र्यांना देणार आहे. हे पथक जालना, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, खामगाव, चिखली व जळगाव या तालुक्यांत जाऊन लोकांची संवाद साधेल.

१६२ किमीच्या मार्गाचा यापूर्वीही सर्व्हे, अधिकाऱ्यांचा नकार
सुमारे १६२ किमी अंतराच्या या मार्गासाठी यापूर्वीही सर्व्हे झाला होता. मात्र हा रेल्वेमार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव गुंडाळून ठेवला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नव्याने सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...