आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू घाटांचे प्राथमिक सर्वेक्षण:लिलावासाठी वाळू घाटांचे सर्वेक्षण

जालना9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विविध २२ वाळू घाटांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले असून आता पाणी आटल्यानंतर अंतिम सर्वेक्षण करून लिलाव प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. पूर्वानुभव लक्षात घेऊन यंदा डिसेंबरपूर्वीच लिलाव करण्याची तयारी असल्याची माहिती खनिकर्म विभागातील सूत्रांनी दिली.

गतवर्षी २४ वाळू घाटांचा लिलाव करून वाळू उपशासाठी ९ जूनची मुदत देण्यात आली होती. सदरील मुदत संपल्यावर परवानगी दिलेल्या सर्व २४ वाळू घाटांचा ताबा संबंधित तहसीलदारांनी घेतला. लिलावाच्या वेळी एक लाख २६ हजार ३३ ब्रास वाळू साठा होता, जो संबंधित कंत्राटदारांनी उपसला व त्यातून शासनाला २४ कोटी ८ लाख १४ हजार १४८ रुपयांचा महसूल मिळाला. तर ज्यांनी वाळूचा साठा करून ठेवला होता, त्यांना परवानगी घेऊनच पुढे वाळू विक्रीची परवानगी दिली होती. आता साठा करून ठेवलेल्या वाळू विक्रीची मुदतही येत्या ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे नव्याने लिलाव प्रक्रिया राबवली जाणार अाहे,