आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:सीएचओ भरती प्रक्रियेला स्थगिती द्या; होमिओपॅथिक डॉक्टरांचा मोर्चा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सीएचओ पदभरती प्रक्रियेत होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स अँड स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जिल्हाभरातून होमिओपॅथिक डॉक्टरांची उपस्थिती होती.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा अभियान, संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी ९ डिसेंबर २०२२ रोजी समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षणार्थी पदभरतीबाबत जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती प्रक्रियेत आयुर्वेदिक, युनानी नर्सिंग यांना समाविष्ट केले असून होमिओपॅथिक डॉक्टरांना वंचित ठेवले आहे. या निषेधार्थ होमिओपॅथी डॉक्टर्स अँड स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने पायी मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला आहे. सीएचओ पदभरतीमध्ये सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करेपर्यंत पदभरतीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. या मोर्चाला जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश ढेंबरे, डॉ. कांचन देसरडा, डॉ. चोपडे, डॉ. विजय सवुडे, डॉ. सेनानी, डॉ. जैन, डॉ. पाटील, डॉ. देशपांडे, डॉ. हतनूरकर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...