आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शुक्रवारी धाकलगाव रस्त्यावर चक्का जामचा इशारा

वडीगोद्री6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.जालना जिल्ह्यातील अतिवष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबिन, कपाशी, तुर आदी खरीप पिकांचा विमा तत्काळ देण्यात यावा. आंबिया बहार २०२१ चा मोसंबी फळपीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा.

तसेच गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला एफ आर पी अधिक २०० रूपये तत्काळ देण्यात यावे. दोन तुकड्यातील एफआरपी चा बेकायदेशीर कायदा दुरूस्त करून एक रकमी एफआरपीचा कायदा मंजूर करण्यात यावा.

यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २५ नोव्हेंबर रोजी अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी या चक्का जाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, गणेश गावडे, अंकुश तारख, बाबासाहेब दखणे, विष्णू नाझरकर, भारत उंडे, पांडूरंग गटकळ, उमेश पाष्टे, गोपाल खोमणे यांच्यासह आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...